पौर्णिमेच्या चंद्राचा मुखावर प्रकाश
तिच्या प्रेमाचे माझ्याभोवती पाश
तिचे केस उरोजावर विराजमान
मीच फक्त त्या सौंदर्याचा यजमान
निळ्याशार वस्त्रातली नीलपरी
जांभूळ पिकले नखांवरी
पापण्यांचा पदर झुकलेला खाली
गालावर पसरलेली लाजेची लाली
गुलपाकळ्या विलसलेल्या ओठांवरी
काळाभोर मस्कारा नेत्रांच्या काठावरी
स्पर्शाच्या जादूने चेहरा गोरा मोरा
माझ्या चंद्राच्या न डागाचा मलाच तोरा
चेहरा लाल लाजून चूर
झाकला चेहरा मिलनास पूर
प्रणयास आतूर ती प्रणयराधिनी
मनवण्यास कातर मी मनोमनी
अशा सांजवेळी भेट अशी झाली
मनाची तनाशी कशी थेट झाली