काळजी.....
आदर.....
भावनांची कदर.....
स्तुती
खरोखर.....
चुका
प्रेमाने सादर.....
भूक
मनाची अधीर.....
मग
ओढला जातो पदर.....
उष्ण रक्ताचा प्रवाह शरीरभर.....
नसा
दोघांच्या एका ह्रदयाशी कदर.....
मनाच्या मिलनाला तनाचा आधार.....
असेच राहू दे आपले प्रेम आयुष्यभर.....