तू
आणि मी आपापल्या जागेवर बरोबर
योगायोगच
इतके कि वाटते सर्व खरोखर
तू ‘त्या’
वेळा पाहिलेल्या ज्या मी इतरांसाठी पाळलेल्या
असे
वाटून झालेल्या वादाने प्रतिमा डागाळलेल्या ….
नात्याला
बंधन नाही न कायद्याचे न वायद्याचे
अन आपल्याला
हे नाते नाही ठेवायचे फक्त सौद्याचे
भेगाळलेल्या मनाला शरीराचे शिंपण काही दिवस पुरेल हि
पण
विश्वासाचा ओलावा टिकून मनाची माती कायमची ओलेल हि ?
प्रश्न
आहे खूप मोठा आ वासून उभा राहिलेला...
खुपदा
आपल्या बोलण्यात बऱ्याचदा गायलेला
शेवटी
ठरला एक अपरिहार्य निर्णय....
“काही
दिवस” थांबू...क्षण झाला हा निर्दय
ह्या
निर्णयाला न काळ न वेळ
मनाच्या
घालमेलीचा अस्वस्थ खेळ
“दिसायला”
तू शांत अन मी हि शांत
पण मन
ढवळून होतेय प्रशांत
वाट
पाहतोय तुझे हे “काही दिवस” कधी संपतील
“नाही
जमत तुमच्याशिवाय” म्हणत तुझे ओठ माझ्या मिठीत कंपतील !