आठवणींचे आभाळ
अंतःकरण गहाळ
निघून जाते वेळ
बसत नाही मनाचा मेळ
पावसाचा थेंब
मन ओले चिंब
माझ प्रतिबिंब
पाण्यात झाले चिंब
अर्थहीन शब्द
काव्यात बद्ध
मनाच कवाड बंद
कवीची मती गुंग
शब्द म्हणतात मला शोध
मनाचा आड खोल खोद
शब्दांचे माझ्याशी भांडण झालंय
काव्याचे त्यांच्याशी संगनमत झालंय
No comments:
Post a Comment