तुझ्या हातातला माझा आश्वासक हात
तुला विश्वास सबळ देऊन गेला
तुझ्या मुखावरून फिरलेला माझा हात
तुला आणखीनच जवळ घेऊन गेला
तुझ्या केसातून माझा फिरलेला हात
तुझ्या मनाला मोहरून गेला
तुला बाहुपाशात ओढलेला माझा हात
तुझ्या तनाला शहारून गेला
माझ्या केसातून तूझा फिरलेला प्रेमळ हात
माझ्या प्रेमात पतित पावन होऊन गेला
तुझ्या सिंहकटी कंबरेवर ठेवलेला माझा हात
प्रेमाने भिजलेला श्रावण होऊन गेला
माझ्या मुखावरून तूझा फिरलेला हात
माझ्या मनाभोवती फेर धरून गेला
माझ्या बाहुपाशात तुझा विसावलेला हात
तुझ्या विश्वासाची पावती हेर देऊन गेला
एकमेकांच्या हाताच्या स्पर्शांनी
आपली जवळ येण्याची मनमोकळी वाट झाली
आपल्या जीवनात कित्येक वर्षांनी
परमोच्च सुखाच्या सुरुवातीची सोनसळी पहाट झाली