Pages

Monday, April 1, 2013

परी

तू .......................

हवी हवीशी वाटणारी वार् याची झुळूक
पहिल्याच पावसाची पहिलीच चळक

पहिल्या पावसानंतरचा मृद् गंध
दिवाळीच्या अभ्यंगानंतरचा सुवास मंद
 
पहाटे पडलेला प्राजक्ताचा सडा
भर उनातला पाण्याचा तृप्त घडा

समिश्र भावनांनी गात्रात होणारी खलबली
पायांना संथ पाण्यात होणारी गुदगुली

केसाच्या बटेतून ओठांवर स्थिरावलेला पावसाचा थेंब
न बोलताच होणारी ओठांची बडबड पावसात चिंब

नवजात बालकावर पडलेले सोनेरी किरण
वाळलेल्या जखमेचे मनात राहिलेले रक्तेरी व्रण
 
घामेजलेल्या उनातली वटवृक्षाची सावली
लक्ष्मीच्या रुपाने रस्त्यात मिळालेली पावली

मनाच्या कोन्यात कायमचा वास केलेली जशी नवी नवरी 
माझ्या नवसाला पावलेली आणि मनाला घावलेली परी

2 comments:

  1. पहिल्याच पावसाची पहिलीच (चळक) ek navin shabd arthat mazya sathi ..वाळलेल्या जखमेचे मनात राहिलेले( रक्तेरी )व्रण shabd sundarch......

    khup sundar kavita....!

    ReplyDelete
    Replies
    1. चळक हा शब्द सांगलीकडे प्रचिलीत आहे.पावसाची एक चळक येऊन गेली असे म्हंटले जाते.मला वाटले कि "रक्तेरी" ह्या शब्दाला तुम्ही नवीन म्हणाल.
      Thanks for your comments!

      Delete