Pages

Monday, February 24, 2014

पुन्हा पाऊस....



पाऊस.….
तुझ्या मनातून ओसंडताना पाहिलेला……

पाऊस.….
तुझ्या नयनातून सांडताना पाहिलेला……


पाऊस.….
तुझ्या गालावरून ओथंबताना पाहिलेला.…

पाऊस.….
तुझ्या ओल्या अंगाला झोंबताना पाहिलेला …….

पाऊस.….
तुझ्या भिजल्या पदरातून पीळताना पाहिलेला.……

पाऊस.….
तुझ्या केसातून थेंबाना माळताना पाहिलेला.……


पाऊस.….
तुझ्या चिंब अंगावर लाजताना पाहिलेला.….


पाऊस.….                                                                                          या आवी'ट गोड आठवणीत मी मला भिजताना पाहिलेला …. 





आदिविज.……  












 


पाऊस …....

 
पाऊस …
शंकराच्या  पिंडीवर
थेंब थेंब होऊन पडताना पाहिलेला…. 
 
पाऊस …
तुका ज्ञानाच्या दिंडीवर 
वारकऱ्यांच्या श्रद्धेत वाहताना पाहिलेला…   

पाऊस …
बाजीप्रभूंच्या पराक्रमी रक्ताला पावनखिंडीवर
सांडताना पाहिलेला ….

पाऊस …
खट्याळ कान्हाच्या नाठाळ करामतीना दहीहंडीवर 
खेळताना पाहिलेला ….

पाऊस …
गांधीच्या सत्याच्या आग्रहाला दांडीवर
मीठ चाखताना पाहिलेला ….

पाऊस …
कर्णाच्या संयमाची परीक्षा मांडीवर
जळूने रक्त पिताना पाहिलेला ….

पाऊस …
शेतकऱ्यांच्या मुंडीवर 
कर्जाच्या फासाला लटकताना पाहिलेला …… 

पाऊस … 
नराधमांच्या झुंडीवर
अबलेवरचा अत्याचार  सोसताना पाहिलेला ….

पाऊस …
ऊसाच्या कांडीवर
शेतकऱ्यांच्या स्वप्नांना  साखर सम्राटांनी भंगताना पहिलेला …।

पाऊस …
माझ्या मनाला ह्या यातना खंडीभर  
झोंबताना पाहिलेला ….



आदिवीज ……।