पाऊस …
शंकराच्या पिंडीवर
थेंब थेंब होऊन पडताना पाहिलेला….
पाऊस …
तुका ज्ञानाच्या दिंडीवर
वारकऱ्यांच्या श्रद्धेत वाहताना पाहिलेला…
पाऊस …
बाजीप्रभूंच्या पराक्रमी रक्ताला पावनखिंडीवर
सांडताना पाहिलेला ….
पाऊस …
खट्याळ कान्हाच्या नाठाळ करामतीना दहीहंडीवर
खेळताना पाहिलेला ….
पाऊस …
गांधीच्या सत्याच्या आग्रहाला दांडीवर
मीठ चाखताना पाहिलेला ….
पाऊस …
कर्णाच्या संयमाची परीक्षा मांडीवर
जळूने रक्त पिताना पाहिलेला ….
पाऊस …
शेतकऱ्यांच्या मुंडीवर
कर्जाच्या फासाला लटकताना पाहिलेला ……
पाऊस …
नराधमांच्या झुंडीवर
अबलेवरचा अत्याचार सोसताना पाहिलेला ….
पाऊस …
ऊसाच्या कांडीवर
शेतकऱ्यांच्या स्वप्नांना साखर सम्राटांनी भंगताना पहिलेला …।
पाऊस …
माझ्या मनाला ह्या यातना खंडीभर
झोंबताना पाहिलेला ….
आदिवीज ……।
No comments:
Post a Comment