जीवनात बऱ्याचदा येते अशी वेळ
दोन पर्यायामध्ये
एकावर येताना होतो विचारांचा खेळ
मनाची होते उगीचच घालमेल
निर्णयापेक्षा बाकीच
विचारांची रेलेचेल
काय करावे हे न
सुचले कि काय करावे बरे?
मनाच्या या दोन
दगडावर पाय ठेवण्याला काय म्हणावे बरे?
टक्केवारी ठरवून होत
असते तर किती झाले असते छान?
हि गोष्टच अवघड भारी;
जे ठरवू ते होईलच ह्याचे नसते भान
निर्णय मनाने
घ्यायचा कि बुद्धीने नाही कळत
पुढच्या पुढे पाहू
ह्या विचाराला पण गती नाही मिळत
कधी कधी वाटते
अशिक्षित असण्याचे किती तरी फायदे
सुशिक्षितपणामुळे
बुद्धीने भक्षित होण्याचेच जास्त सौदे
अशा लिहिण्याने तर कुठे
होणार आहे निर्णय पक्का?
उगीचच शब्दांचा
भडीमार आणि मनाची द्विधा १०० टक्का
पण एक खरे कि लिहून मनाला
मिळतो थोडा आराम
निर्णय होवो न होवो
नव्याला सुरुवात आणि जुन्याला राम राम
----आदिवीज,
०९-मार्च-२०१३
khup chhan kavita aahe.
ReplyDeleteThanks Manaswi!
Delete