Pages

Wednesday, March 27, 2013

साद


मंद वाऱ्याच्या झुळूकेने   
शरीरावर मोरपीस फिरवावे तशी शहरालीस

कळतच न कळत घडते च्या ओळीत
जणू साताजन्माच्या ओळखीच्या आनंदाने मोहरलीस    

कधी कधी आपण काय बोललो
या पेक्षा फक्त बोललो हे पण खूप असते

मग अचानक विचारलेल्या प्रश्नांनंतर
शून्यात असणे हे कशाला लसते?

मनात दुसरेच वादळ चालू असते
मनातल्या भावनांना आपण ओलवत असतो

हृदयाची कळ दाबणे चालू असते
मनाचे ओठांवर न यायला मनालाच भुलवत असतो  

असा मनाशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतो
समाजाच्या संहिताना झेलत झेलत मनाविरुद्ध मनालाच पोळत बसतो

कधी कधी आपल्याला हवी असणारी दोरी तीव्रतेने ओढावीशी वाटते
त्याच वेळी समाजाच्या संस्काराची तिजोरी आर्ततेने फोडाविशी वाटते     

समाजाने समाजासाठीच्या केलेल्या नियमाना अपवाद हवा
माहित आहे याला खतपाणी घातले तर सुरु होईल वाद नवा

हे समाजाचे अस्तित्व झुगारणे नाही
समाजाच्या तत्वावर बंडखोरीची तलवार उगारणे नाही

अपवादाला अपवाद म्हणूनच बघा
त्यालाही त्याची स्वतःची आहे जागा

आपण हा अपवाद आहे हे तुला माहित आहे
तुला माझी साद माझ्या सहित आहे

2 comments:

  1. solid poem aahe...! bold......! samajachya pravahala bhedun jane kinva samajachya pravaha viruddh jaane donhitahi don apavadi jivaanchi farfatch aahe...! aani evhadhe sare karunhi..... anti sambram urtoch... he sarva barobar aahe....? samajapeksha manachya sanskarachya dorya todane jasta kathin asate....!

    Aadiji apratim .... bhavana shabdat mandatanahi kuthech maryada sodlelya nahit .... pan tarihi bold vatatat....!

    ReplyDelete
  2. तुम्ही माझ्या कवितेतला गर्भितार्थ पटकन समजता. तुम्ही जी comment दिलीत ती बरोबर आहे. आणखी एक " समाजापेक्षा मनाच्या संस्काराच्या दोऱ्या तोडणे जास्त कठीण असते" हे पण तितकेच खरे आहे.

    अशा comment मिळाल्या कि माझ्यासारख्या लिहिणाऱ्याला आणखीनच लिहिल्ण्याचे बळ मिळते. अश्याच comments देत जा. Hearty Thanks for your comments! & keep commenting which gives me further enhancement in composing poems!!!!

    ReplyDelete