Pages

Friday, May 30, 2014

निष्कर्ष

करंगळीच्या दुखण्याला मी केलेला स्पर्श
मला कोण एक देऊन गेला हर्ष!
वाटले नाही ....पटले नाही...नाही नुसता तर्क
माझ्या मनाने काढलेला निष्कर्ष
आपल्या भेटण्याला झालीत कित्येक वर्ष!

सुखाची हार....

डोळे बंद केले कि ........
तू समोर दिसतेस....
काहीच कारण नसते...
तू खळखळून हसतेस.....

कसे जमते तुला?
दुखाच्या डोहात सुखाचे फवारे उडवायला?
कि हा सगळा फार्स! मला दाखवायला........
बघ मी किती सुखी आहे....

सुखी झाले म्हणून सुखी होण्यात  
काही बळ फार नसते....
तुझ्या हसण्यातल्या कारुण्यात 
मला कुठे तरी सुखाची हार दिसते....

प्रेमाची घट्ट वीण .........

हात हातात घेतला तेव्हाचा तुझा श्वास  
थांबलेला मला जाणवत होता
आपल्याला एकमेकांचा सहवास
लाभलेला मनाला मानवत होता

हळूच फिरलेला माझा केसातून हात
तुला माहित हि नव्हता...........
हळूच र्हदयाच्या कोंदणात घातलेला हात
तुला माहित हि नव्हता ..........

बोलतानाची चोरून माझ्यावर पडलेली नजर
बरेच काही करत होती
चकुन घडलेली नजरानजर
मनात प्रेमाचा गजर करत होती 

तुझ्या नकळत तुला मी पाहत होतो
तुझा उजळलेला चेहरा मला तेजस्वी वाटला
परत परत तुझ्या प्रेमात वाहत होतो
वाटले होते आपल्या प्रेमाचा झरा मागेच आटला

हात ठेवलेला हातावर
तसाच राहावा सारखे वाटत होते
जाताना सोडलेला तुझा पदर
मनाला खूप पोरके वाटत होते

इतकी का आपल्या प्रेमाची घट्ट वीण होती
जी वर्षानुवर्षाच्या विरहाने सशक्त घडून गेली
इतकी का आपल्या विरहाची भिंत क्षीण होती
जी कित्येक वर्षाच्या भेटीनंतर पडून गेली

अशावेळी वाटते आपण परत एकत्र यावे
प्रेमाच्या धुंदीत वाहून जावे
असेच हे कायम सत्र जावे
कायमचे एकमेकांचे राहून जावे 
-----------------------------------------------आदिवीज ---

माझा भूतकाळ........

माझा भूतकाळ आ वासून माझ्या समोर आला
जीव आनंदला इथ पासून तिथ पावसातला मोर झाला

पण.........
मी भेटतोय तू बोलावलेस म्हणून.....
मी काही क्षणासाठी आहे तुझ्या सोबत....
परत मला भेटायचे नाही.... बोलायचे नाही....
आपण होतो कधी एकमेकांचे ते विसरायचे...
सरलेल्या आठवणीना गोल घालायचे....
केलेल्या प्रेमाला खोल विहिरीत बुडवायचे....

मी मनात म्हणालो...इतकेच सांगायचे तर आलासच कशाला?

तो बोलला....
तुला सांगायच्या होत्या .....तू नसतानाच्या सरलेल्या रात्री....
सांगायचा होता तुला ........टाहो फोडून देवाला घातलेला धावा.....
विचारायचे होते देवाला......तोडायचेच होते नाते तर कशाला जोडलेस...
ठेवायच्या होत्या समोर....जागून काढलेल्या रात्री ......
उलगडायचे होते तुझ्यासमोर.....तेव्हाचे भरकटलेले मन......
काय सांगू तुला..... सावरायला खूप वेळ लागला....
विचारात वाहून गेलेला..... तो भरभरून बोलत होता.......
मी ऐकत होतो त्याला मनापासून ....बघत होतो त्याला मन भरून...
माहित नव्हते परत कधी तो भेटेल...कि भेटणारच नाही.....

तो १५ मिनिटांसाठी आला.....१ तास थांबला
चार वेळा उठला....जाण्यासाठी .....
मी म्हणालो म्हणून थांबला!
कि त्याचा पाय पण निघत नव्हता?

अडखळत पाय ओढत तो माझ्या बरोबर उठला
चाललो सात पावले बरोबर....सप्तपदी म्हणावी का त्याला...शेवटची?

-----------------------------------------------आदिवीज ---