माझा भूतकाळ आ वासून माझ्या समोर आला
जीव आनंदला इथ पासून तिथ पावसातला मोर झाला
पण.........
मी भेटतोय तू बोलावलेस म्हणून.....
मी काही क्षणासाठी आहे तुझ्या सोबत....
परत मला भेटायचे नाही.... बोलायचे नाही....
आपण होतो कधी एकमेकांचे ते विसरायचे...
सरलेल्या आठवणीना गोल घालायचे....
केलेल्या प्रेमाला खोल विहिरीत बुडवायचे....
मी मनात म्हणालो...इतकेच सांगायचे तर आलासच कशाला?
तो बोलला....
तुला सांगायच्या होत्या .....तू नसतानाच्या सरलेल्या रात्री....
सांगायचा होता तुला ........टाहो फोडून देवाला घातलेला धावा.....
विचारायचे होते देवाला......तोडायचेच होते नाते तर कशाला जोडलेस...
ठेवायच्या होत्या समोर....जागून काढलेल्या रात्री ......
उलगडायचे होते तुझ्यासमोर.....तेव्हाचे भरकटलेले मन......
काय सांगू तुला..... सावरायला खूप वेळ लागला....
विचारात वाहून गेलेला..... तो भरभरून बोलत होता.......
मी ऐकत होतो त्याला मनापासून ....बघत होतो त्याला मन भरून...
माहित नव्हते परत कधी तो भेटेल...कि भेटणारच नाही.....
तो १५ मिनिटांसाठी आला.....१ तास थांबला
चार वेळा उठला....जाण्यासाठी .....
मी म्हणालो म्हणून थांबला!
कि त्याचा पाय पण निघत नव्हता?
अडखळत पाय ओढत तो माझ्या बरोबर उठला
चाललो सात पावले बरोबर....सप्तपदी म्हणावी का त्याला...शेवटची?
-----------------------------------------------आदिवीज ---
No comments:
Post a Comment