हात हातात घेतला तेव्हाचा तुझा श्वास
थांबलेला मला जाणवत होता
आपल्याला एकमेकांचा सहवास
लाभलेला मनाला मानवत होता
हळूच फिरलेला माझा केसातून हात
तुला माहित हि नव्हता...........
हळूच र्हदयाच्या कोंदणात घातलेला हात
तुला माहित हि नव्हता ..........
बोलतानाची चोरून माझ्यावर पडलेली नजर
बरेच काही करत होती
चकुन घडलेली नजरानजर
मनात प्रेमाचा गजर करत होती
तुझ्या नकळत तुला मी पाहत होतो
तुझा उजळलेला चेहरा मला तेजस्वी वाटला
परत परत तुझ्या प्रेमात वाहत होतो
वाटले होते आपल्या प्रेमाचा झरा मागेच आटला
हात ठेवलेला हातावर
तसाच राहावा सारखे वाटत होते
जाताना सोडलेला तुझा पदर
मनाला खूप पोरके वाटत होते
इतकी का आपल्या प्रेमाची घट्ट वीण होती
जी वर्षानुवर्षाच्या विरहाने सशक्त घडून गेली
इतकी का आपल्या विरहाची भिंत क्षीण होती
जी कित्येक वर्षाच्या भेटीनंतर पडून गेली
अशावेळी वाटते आपण परत एकत्र यावे
प्रेमाच्या धुंदीत वाहून जावे
असेच हे कायम सत्र जावे
कायमचे एकमेकांचे राहून जावे
-----------------------------------------------आदिवीज ---
No comments:
Post a Comment