Pages

Thursday, July 28, 2016

खरी वस्तुस्थिती

वीज आकाशातून कोसळणे
तसे आपले कालचे भांडणे
पण आजचे निराळेच वागणे !
आपल्याला परत एकत्र आणणे

नात्याला अनेक पदर
त्यातलाच भांडण एक पदर
परिस्थिती होते कधी कधी गदर
पण वस्तुस्थितीची ठेवावी कदर  

प्रत्येक पदर उलगडतच
नाते जपावे लागते
प्रत्येक गुंता सोडवतच  
नाते रोपावे लागते

उगीच मता मतातील मतांतर
नात्याची दोरी उसवतात
अन मग मना मनातले अंतर
सत्याच्या उरी खोटी प्रीती भासवतात   

विचारा विचारातील तर्क वितर्क
सत्याला असत्य होऊन छळतो 
सत्य आणि भास ह्यातला फरक
वस्तुस्थितीने स्वच्छ कळतो

आपली वस्तुस्थिती म्हणजेच
आपले लग्नाचे नाते पवित्र
कितीही आले आपल्या आयुष्यात पेच
आपल्याला आणेल हेच नाते एकत्र

Wednesday, July 27, 2016

परिस्थिती



आयुष्य असे सुलटे होतेय असे वाटते
तोवर काहीतरी उलटे घडते
पुढे जायची वाटच खुंटते
चांगल्या विचारांची वीण सडते

कुणाला माहित रोज आपल्यासमोर काय वाढलेय
एक संपेल प्रश्न तर दुसरा उभा असेल?
आपली काहीच चूक नसताना हे असे घडतेय
काहीच कळत नाही पण अशा परिस्थितीची सवय वसेल

लांडगा आला रे आला असे होऊन जाईल
न तूप न तेल; हाथी फक्त धुपाटणे राहील
परिस्थितीची जाणीव आपण कशी ठेवत नाही
इतकी का परिस्थितीने मनाची स्थिती वाईट होई ?

एक तर परिस्थिती बदलण्याची वाट पहाणे
नाही तर.. आपणच बदलून जाणे
आहे त्या परिस्थितीला कवेत घेणे
नात्याच्या बंधनांना विरू हवेत देणे

खूप कंटाळा आलाय घडणाऱ्या गोष्टींचा
खूप कंटाळा आलाय अविश्वासाच्या सृष्टीचा
खूप कंटाळा आलाय सर्व घटनांचा
घ्यावा थोडा विसावा ह्या नात्याचा........

Thursday, June 23, 2016

तू, मी आणि 'काही दिवस'

तू आणि मी आपापल्या जागेवर बरोबर
योगायोगच इतके कि वाटते सर्व खरोखर
तू त्यावेळा पाहिलेल्या ज्या मी इतरांसाठी पाळलेल्या
असे वाटून झालेल्या वादाने प्रतिमा डागाळलेल्या …. 
नात्याला बंधन नाही न कायद्याचे न वायद्याचे
अन आपल्याला हे नाते नाही ठेवायचे फक्त सौद्याचे
भेगाळलेल्या मनाला शरीराचे शिंपण काही दिवस पुरेल हि 
पण विश्वासाचा ओलावा टिकून मनाची माती कायमची ओलेल हि ?
प्रश्न आहे खूप मोठा आ वासून उभा राहिलेला...
खुपदा आपल्या बोलण्यात बऱ्याचदा गायलेला
शेवटी ठरला एक अपरिहार्य निर्णय....
“काही दिवस” थांबू...क्षण झाला हा निर्दय
ह्या निर्णयाला न काळ न वेळ
मनाच्या घालमेलीचा अस्वस्थ खेळ
“दिसायला” तू शांत अन मी हि शांत
पण मन ढवळून होतेय प्रशांत
वाट पाहतोय तुझे हे “काही दिवस” कधी संपतील
“नाही जमत तुमच्याशिवाय” म्हणत तुझे ओठ माझ्या मिठीत कंपतील ! 

Friday, April 22, 2016

कविता माझी माय

कविता माझी जीव कि प्राण आहे 
उदासपणावर उपाय हा रामबाण आहे

कवितेशी बोलले कि मन कोवळे होते 
दिलेच असतील कुणी व्रण तर मन हळवे होते 

तिला माहित असते मनावर घाव बसला कि हा येणार
ती माझी वाट पाहत वहीतच असते ताणावर गाव रुसला कि हा येणार

इतरांसारखी अपेक्षा न ठेवता ती मला कुशीत घेते
ज्यांनी माझी उपेक्षा केली त्या सांडवलेल्या नेत्रांना पुशीत राहते

तिला नाही लागत समजून सांगायला 
ती आहे मजबरोबर जेव्हा लागलो रांगायला

ती मला पाहून समजते मला काय हवे आहे
तिला माझ्या मनातले उमजते तिला काय नवे आहे?

असू दे मला तुझी साथ मला असे सोडू नको
नको ग उगी माझी वाताहात घेतला वसा सोडू नको

तुला आहे माझ्या मायची ची जागा
उगीचच येत नाही तुझ्या कडे हा अभागा  


Thursday, April 21, 2016

पहिला पाऊस

                                                    
पहिला पाऊस ...

खूप हलकासा पण अल्ल्हाददायक...

मनातली...शरिरातली...नात्यातली...गरमी कमी करणारा

हातावर पडलेले चारच थेंब...पावसाच्या...ओलाव्याचे...गारव्याचे... 

बळीराजाला आशा देणारा ... काळजी करू नकोस...मी येईन परत ...

सुकी ओंजळ ओली करायला अन पिकांची ओंजळ शिगोशिग वाहायला....