Pages

Thursday, July 28, 2016

खरी वस्तुस्थिती

वीज आकाशातून कोसळणे
तसे आपले कालचे भांडणे
पण आजचे निराळेच वागणे !
आपल्याला परत एकत्र आणणे

नात्याला अनेक पदर
त्यातलाच भांडण एक पदर
परिस्थिती होते कधी कधी गदर
पण वस्तुस्थितीची ठेवावी कदर  

प्रत्येक पदर उलगडतच
नाते जपावे लागते
प्रत्येक गुंता सोडवतच  
नाते रोपावे लागते

उगीच मता मतातील मतांतर
नात्याची दोरी उसवतात
अन मग मना मनातले अंतर
सत्याच्या उरी खोटी प्रीती भासवतात   

विचारा विचारातील तर्क वितर्क
सत्याला असत्य होऊन छळतो 
सत्य आणि भास ह्यातला फरक
वस्तुस्थितीने स्वच्छ कळतो

आपली वस्तुस्थिती म्हणजेच
आपले लग्नाचे नाते पवित्र
कितीही आले आपल्या आयुष्यात पेच
आपल्याला आणेल हेच नाते एकत्र

No comments:

Post a Comment