आयुष्य असे सुलटे होतेय असे वाटते
तोवर काहीतरी उलटे घडते
पुढे जायची वाटच खुंटते
चांगल्या विचारांची वीण सडते
कुणाला माहित रोज आपल्यासमोर काय वाढलेय
एक संपेल प्रश्न तर दुसरा उभा असेल?
आपली काहीच चूक नसताना हे असे घडतेय
काहीच कळत नाही पण अशा परिस्थितीची सवय वसेल
लांडगा आला रे आला असे होऊन जाईल
न तूप न तेल; हाथी फक्त धुपाटणे राहील
परिस्थितीची जाणीव आपण कशी ठेवत नाही
इतकी का परिस्थितीने मनाची स्थिती वाईट होई ?
एक तर परिस्थिती बदलण्याची वाट पहाणे
नाही तर.. आपणच बदलून जाणे
आहे त्या परिस्थितीला कवेत घेणे
नात्याच्या बंधनांना विरू हवेत देणे
खूप कंटाळा आलाय घडणाऱ्या गोष्टींचा
खूप कंटाळा आलाय अविश्वासाच्या सृष्टीचा
खूप कंटाळा आलाय सर्व घटनांचा
घ्यावा थोडा विसावा ह्या नात्याचा........
No comments:
Post a Comment