तुझ्या आठवणींचे काय सांगू?
मना भोवती लागल्यात पिंगु.
“ए ऐक ना” ची किती सवय झाली आहे सांगू
ती साद परत परत हवीय असे लागले आहे लागू
तशी मला हि अशीच साद घालायची सवय लागली आहे.
माझे मलाच “ए ऐक ना” म्हणून दुधाची तहान ताकावर भागवली आहे
आपल्या बडबडण्याचा कित्येकदा भास होतो.
कधी कधी भासातच राहावे हा हव्यास होतो.
स्वप्नातहि कधी वाटले नाही आधी मी बोलायचे यासाठी आपण भांडू
मनालाही कधी चाटले नाही; वाटायचे आधी कोण बोलायचे यासाठी तन्डू
“किती वाट पाहायची?” म्हणून हक्काने ओरडणारी तू आठवतेस
झोप येत असताना हि न झोपणारी तू माझं मन विचाराने गोठवतेस
“किती उशीर?” म्हणत स्वतः मात्र उशिरा यायचे
१२ तासांच्या त्रासा नंतरही उशिरा पर्यंत डोळ्यात तेल घालायचे
रामकृष्णच्या मठातील ओंकार उगीचच मनात फेर धरायचा.
योगासने संपून परत येईपर्यंत मनाला धीर द्यायचा
तुझी आठवण येत नाही असा दिवस जात नाही
कधी येणार माहित असूनही वाट पाहिल्याशिवाय रात्री नंतरचा दिवसच येत नाही
No comments:
Post a Comment