Pages

Wednesday, May 25, 2011

कळत नकळत केलेले प्रेम

न कळत त्याचे मन कुणावर तरी बसते
हाती होते नव्हते ते सगळे रुसते
त्याला ती च फक्त कारण नसते
त्याच्या करणीची कट्यार त्याच्याच काळजात घूसते

क्षणासाठी कुठेतरी मन गुंतून राहते
मनाची जखम चुकून कधी कधी वाहते
मनाला कधी कधी कुणाचे काहीतरी भावते
आणि मनाला वाटते इथेच प्रेम घावते

ते क्षणीक खरेच असते
पण आयुष्य ह्या प्रेमावर बरेच फसते
आयुष्याच्या या प्रावर्तात कुठले प्रारब्ध वसते?
सगळे आयुष्याचे गणितच या प्रेमात स्तब्ध बसते

यातली मज्जा जन्माची होते सजा
आता कितीही करा खरेपणाच्या खऱ्या गर्जा
संशयाचा आसुर हाच राजा
आणि भांडण तंटा हीच त्यांची राहते प्रजा

आता रोजचेच संशय आणि रोजचेच भडके
घरात आले कि दोघांचे हि तोंड रडके
घरी जाताना मन धडके
घरात प्रेमाचे, आपुलकीचे आणि माणुसकीचे कडके

आयुष्याची हि न भरणारी जखमंच रौद्र
याला आता वेळ हेच खरे औषध
ह्याचा ज्यांना अनुभव त्यांनी त्यांचा घ्यावा शोध
हा मांडला तुमच्या समोर त्याच्या संसाराचा उदासबोध

क्षणासाठी जन्माचे वाईट घडवायचे?
मरणासाठी आधीच सरपण अंगावर चढवायचे?
कशाला आपल्या मनाला सारखे रडवायचे?
क्षणिक प्रेमाचे खोटे सोने मनावर मढवयाचे?

ह्याचा ज्याने त्याने विचार करा
मरण्याआधी मरणाची वाट का धरा?
लग्नाच्या वेळच्या आणाभाका मनात ठरा
असे काही करण्याआधी सप्तपदीची याद करा

मैत्री

मला आधी वाटायचे आपल्या नात्यात
कुठे तरी स्वार्थ दडला आहे
एकमेकांच्या एकटेपणात
मैत्रीचा बांध सर्वार्थ घडला आहे

हळूहळू कळत गेले
हि नाही फक्त एकटेपणाची हूल
मन केव्हापासूनच पेटवत आले
मैत्रीची घट्ट चूल

मैत्रीचे कसे असते बघ
त्याला कोणत्याही नात्याचे नसते जग
फक्त त्याला निखळ प्रेमाचा ओघ
त्याला त्या प्रेमाचाही नसतो रोग (?)

मैत्रीला जितके जपावे
तितकी ती मोहरते
मैत्रीला जितके उलगडावे
तितकी ती बहरते

मैत्रीला कोणताही
अंध बंध नसतो
मैत्रीचा कोणताही
धागा एकसंधच असतो

मैत्रीच्या बाबतीत किती लिहावे
तेवढे थोडेच आहे
मैत्रीत कोणते कोणते नाते पहावे
हे हि एक कोडेच आहे

बघ माझ्या हातून काव्याच्या
ओळीच ओळी घडत आहेत
इतक्या एका पाठून एक वेच्या
गारासारख्या टप टप पडत आहेत

आता थांबावे म्हणतो
नाहीतर मला थांबता येणार नाही
मैत्रीची गाथा किती वेळ गुणगुणतो
मला सांगता येणार नाही

परत आठवण

आज २४ म्हणून उद्याची वाट पाहत
मनाची गात्रे तुझ्या वाटेवर ओतली आहेत
असे कसे मन अडकले घाटात?
मनाची सूत्रे चिखलरानात रुतली आहेत

तुझ्या आठवणींचे दार भव्य
माझ्या कामाच्या वेळी हि उघडते
तुला माहितेय फुलराणीचे काव्य?
ते कसे मनाच्या कानात कधीही बडबडते!

कधी हूरहूर
तर कधी ओढ
माझ्या मनात तुझेच काहूर
हि ओढीची भावनाच किती गं गोड?

ओढ म्हण किवा हूरहूर म्हण
कि आणखी काय माहित नाही
तुझ्या वाटेवर माझ्या मनाचे प्राण
हि सणकी मनाची; माझ्या रहित नाही

स्वच्छ शब्दात सर्व
कधी कधी सांगता येत नाही
मला कितीही असला मोकळ्या मनाचा गर्व
माझ्या मनाला हे वाण मांगता येत नाही

काय कुठे कसा कोणता करायचा विचार
हाच विचार कधी कधी मन सोडून देते
मनावर तुझ्या आठवणींचाच विहार
मग असले  बंधन मन तोडून देते

आता आणखी काय आणि किती लिहू?
इतके बोलून मन झाले निशब्द
आठवण, ओढ, हुरहूर शब्द झाले हे बहू
पण मनावर त्यांच्याच अर्थांचे आकाश निरभ्र

राहू दे जसे आहे तसे मला
माझा जीव तुझ्या ओढीत रमला
हि तर तुझ्या आठवणींचीच कला (कि अवकळा?)
थोड्या वेळेसाठी का असेना हा जीव मनासारखा जगला

आठवण

तुला त्रास द्यायचा नाही हा मनात सूर
म्हणून मेल करायचे टाळले होते
तेव्हा आठवण आणि हि हुरहूर (miss)
या मधले अंतर कळले होते
        
माझ्याच बनवलेल्या व्याख्यांनी
मला आठवून दिले
तुझ्या आठवणींच्या पंखांनी
मला हुरहूर लावून तुला दूर पाठवून दिले

आज हि कवीता लिहिताना
यमक जुळवण्याचा छंद मला जडत नाही
पण तुझ्या आठवणीना कुरवाळण्याची
सवय काही मला सोडत नाही

ह्याला कुरवाळणे म्हण
किंवा हळुवार उलगडणे म्हण
आपल्या आठवणींत माझे मन
पसरत बसले आहे आठवणींचे कणन्कण

मनाची पण मज्जाच आहे
ते कधीच कशाचे भान नाही ठेवत
त्याचे आपले चालूच आहे
आठवणींची ज्योत अखंड ठेवणं तेवत

योगायोग बघ माझ्या मनात
हुरहूर लागावी
अन् त्याच वेळेस तुझ्या मनात
माझी आठवण जागावी?
 
ह्या मागे आपले काही जुने
लागे बांधे नक्कीच असावे
म्हणून या आठवणीत उणे
असे काहीच नसावे

हा आठवणींचा पाऊस
कधीपर्यंत पडत राहील?
तुझ्या परत येण्याची मिळेपर्यंत फूस
 हे असेच घडत राहील