आज २४ म्हणून उद्याची वाट पाहत
मनाची गात्रे तुझ्या वाटेवर ओतली आहेत
असे कसे मन अडकले घाटात?
मनाची सूत्रे चिखलरानात रुतली आहेत
तुझ्या आठवणींचे दार भव्य
माझ्या कामाच्या वेळी हि उघडते
तुला माहितेय फुलराणीचे काव्य?
ते कसे मनाच्या कानात कधीही बडबडते!
कधी हूरहूर
तर कधी ओढ
माझ्या मनात तुझेच काहूर
हि ओढीची भावनाच किती गं गोड?
ओढ म्हण किवा हूरहूर म्हण
कि आणखी काय माहित नाही
तुझ्या वाटेवर माझ्या मनाचे प्राण
हि सणकी मनाची; माझ्या रहित नाही
स्वच्छ शब्दात सर्व
कधी कधी सांगता येत नाही
मला कितीही असला मोकळ्या मनाचा गर्व
माझ्या मनाला हे वाण मांगता येत नाही
काय कुठे कसा कोणता करायचा विचार
हाच विचार कधी कधी मन सोडून देते
मनावर तुझ्या आठवणींचाच विहार
मग असले बंधन मन तोडून देते
आता आणखी काय आणि किती लिहू?
इतके बोलून मन झाले निशब्द
आठवण, ओढ, हुरहूर शब्द झाले हे बहू
पण मनावर त्यांच्याच अर्थांचे आकाश निरभ्र
राहू दे जसे आहे तसे मला
माझा जीव तुझ्या ओढीत रमला
हि तर तुझ्या आठवणींचीच कला (कि अवकळा?)
थोड्या वेळेसाठी का असेना हा जीव मनासारखा जगला
No comments:
Post a Comment