न कळत त्याचे मन कुणावर तरी बसते
हाती होते नव्हते ते सगळे रुसते
त्याला “ती” च फक्त कारण नसते
त्याच्या करणीची कट्यार त्याच्याच काळजात घूसते
क्षणासाठी कुठेतरी मन गुंतून राहते
मनाची जखम चुकून कधी कधी वाहते
मनाला कधी कधी कुणाचे “काहीतरी” भावते
आणि मनाला वाटते इथेच प्रेम घावते
ते क्षणीक खरेच असते
पण आयुष्य ह्या प्रेमावर बरेच फसते
आयुष्याच्या या प्रावर्तात कुठले प्रारब्ध वसते?
सगळे आयुष्याचे गणितच या प्रेमात स्तब्ध बसते
यातली मज्जा जन्माची होते सजा
आता कितीही करा खरेपणाच्या खऱ्या गर्जा
संशयाचा आसुर हाच राजा
आणि भांडण तंटा हीच त्यांची राहते प्रजा
आता रोजचेच संशय आणि रोजचेच भडके
घरात आले कि दोघांचे हि तोंड रडके
घरी जाताना मन धडके
घरात प्रेमाचे, आपुलकीचे आणि माणुसकीचे कडके
आयुष्याची हि न भरणारी जखमंच रौद्र
याला आता वेळ हेच खरे औषध
ह्याचा ज्यांना अनुभव त्यांनी त्यांचा घ्यावा शोध
हा मांडला तुमच्या समोर त्याच्या संसाराचा उदासबोध
क्षणासाठी जन्माचे वाईट घडवायचे?
मरणासाठी आधीच सरपण अंगावर चढवायचे?
कशाला आपल्या मनाला सारखे रडवायचे?
क्षणिक प्रेमाचे खोटे सोने मनावर मढवयाचे?
ह्याचा ज्याने त्याने विचार करा
मरण्याआधी मरणाची वाट का धरा?
लग्नाच्या वेळच्या आणाभाका मनात ठरा
असे काही करण्याआधी सप्तपदीची याद करा
No comments:
Post a Comment