तुला त्रास द्यायचा नाही हा मनात सूर
म्हणून मेल करायचे टाळले होते
तेव्हा आठवण आणि हि हुरहूर (miss)
या मधले अंतर कळले होते
माझ्याच बनवलेल्या व्याख्यांनी
मला आठवून दिले
तुझ्या आठवणींच्या पंखांनी
मला हुरहूर लावून तुला दूर पाठवून दिले
आज हि कवीता लिहिताना
यमक जुळवण्याचा छंद मला जडत नाही
पण तुझ्या आठवणीना कुरवाळण्याची
सवय काही मला सोडत नाही
ह्याला कुरवाळणे म्हण
किंवा हळुवार उलगडणे म्हण
आपल्या आठवणींत माझे मन
पसरत बसले आहे आठवणींचे कणन्कण
मनाची पण मज्जाच आहे
ते कधीच कशाचे भान नाही ठेवत
त्याचे आपले चालूच आहे
आठवणींची ज्योत अखंड ठेवणं तेवत
योगायोग बघ माझ्या मनात
हुरहूर लागावी
अन् त्याच वेळेस तुझ्या मनात
माझी आठवण जागावी?
ह्या मागे आपले काही जुने
लागे बांधे नक्कीच असावे
म्हणून या आठवणीत उणे
असे काहीच नसावे
हा आठवणींचा पाऊस
कधीपर्यंत पडत राहील?
तुझ्या परत येण्याची मिळेपर्यंत फूस
हे असेच घडत राहील
No comments:
Post a Comment