बालपणीचे प्रेम? मैत्रीची फुलवात
यौवनातले प्रेम? जवानी अव्याहत
चोरटे प्रेम? जुळले सुत
रातीच्या रतीचे प्रेम? स्वतःचाच घात
चीतेवरच्या सतीचे प्रेम? समाजाची रीत
नवरा बायकोचे प्रेम? रोजचा डाळभात
विधवेचे नवरयावरचे प्रेम? विझलेली प्रेमवात
म्हातारपणातले प्रेम? टाकली कात
अखंड प्रेम? सरिता वहात
लग्नेतर प्रेम? झाकली मुठ सव्वा लाख
No comments:
Post a Comment