पहाटेच्या
स्वच्छ मनात सगळे कसे
निर्मळ वाटते
पहाटेच्या
सुर्याचे तेव्हाच तांबडे
फुटते
वातावरणातली
निर्मळता मनातही
कोंदण करते
मन हि मग
या निर्मळतेची ओंजळ भरते
पक्ष्यांच्या
किलकिलाटाने वातावरणात सुंदर नाद भरतो
त्या
आवाजाने मनातल्या किल्मिशांचा सुंदर संवाद उरतो
रामप्रहरीचे
कोवळे ऊन बाळाला
स्पर्शून जाते
त्याच्या
मुखातली अनामिक धून मनाला
हर्षून जाते
अशा
पहाटेचा अनुभव अलीकडे खूप
कमी येतो
पुढच्या
आयुष्याच्या प्रसन्नतेसाठी हाच तो काय आता कामी येतो
Superb I like it
ReplyDelete