Pages

Monday, May 13, 2013

प्रणयराधिनी

पौर्णिमेच्या चंद्राचा मुखावर प्रकाश
तिच्या प्रेमाचे माझ्याभोवती पाश

तिचे केस उरोजावर विराजमान
मीच फक्त त्या सौंदर्याचा यजमान

निळ्याशार वस्त्रातली नीलपरी
जांभूळ पिकले नखांवरी

पापण्यांचा पदर झुकलेला खाली
गालावर पसरलेली लाजेची लाली

गुलपाकळ्या विलसलेल्या ओठांवरी
काळाभोर मस्कारा नेत्रांच्या काठावरी

स्पर्शाच्या जादूने चेहरा गोरा मोरा
माझ्या चंद्राच्या न डागाचा मलाच तोरा

चेहरा लाल लाजून चूर
झाकला चेहरा मिलनास पूर

प्रणयास आतूर ती प्रणयराधिनी
मनवण्यास कातर मी मनोमनी   

अशा सांजवेळी भेट अशी झाली
मनाची तनाशी कशी थेट झाली 


Saturday, April 6, 2013

स्पर्श हातांचा............

तुझ्या हातातला माझा आश्वासक हात
तुला विश्वास सबळ देऊन गेला
तुझ्या मुखावरून फिरलेला माझा हात
तुला आणखीनच जवळ घेऊन गेला

तुझ्या केसातून माझा फिरलेला हात
तुझ्या मनाला मोहरून गेला
तुला बाहुपाशात ओढलेला माझा हात
तुझ्या तनाला शहारून गेला

माझ्या केसातून तूझा फिरलेला प्रेमळ हात
माझ्या प्रेमात पतित पावन होऊन गेला
तुझ्या सिंहकटी कंबरेवर ठेवलेला माझा हात
प्रेमाने भिजलेला श्रावण होऊन गेला

माझ्या मुखावरून तूझा फिरलेला हात
माझ्या मनाभोवती फेर धरून गेला
माझ्या बाहुपाशात तुझा विसावलेला हात
तुझ्या विश्वासाची पावती हेर देऊन गेला

एकमेकांच्या हाताच्या स्पर्शांनी
आपली जवळ येण्याची मनमोकळी वाट झाली
आपल्या जीवनात कित्येक वर्षांनी
परमोच्च सुखाच्या सुरुवातीची सोनसळी पहाट झाली 

सौंदर्याची राणी

गाल गोबरे
शहाळ्याचे खोबरे

जीवनी जीवघेणी
ओळख देखणी

नेत्र काळेशार
मन वेडे ठार

नाक सरळ
मना भुरळ 

ओठ चंद्रकोर
वेड पोर

केस काळेभोर
जीवाला घोर

कपाळ रेखीव
टाके आखीव

उरोजाचा उभार
नेत्र आरपार 

काया मदनी  
सौंदर्याची राणी

Monday, April 1, 2013

परी

तू .......................

हवी हवीशी वाटणारी वार् याची झुळूक
पहिल्याच पावसाची पहिलीच चळक

पहिल्या पावसानंतरचा मृद् गंध
दिवाळीच्या अभ्यंगानंतरचा सुवास मंद
 
पहाटे पडलेला प्राजक्ताचा सडा
भर उनातला पाण्याचा तृप्त घडा

समिश्र भावनांनी गात्रात होणारी खलबली
पायांना संथ पाण्यात होणारी गुदगुली

केसाच्या बटेतून ओठांवर स्थिरावलेला पावसाचा थेंब
न बोलताच होणारी ओठांची बडबड पावसात चिंब

नवजात बालकावर पडलेले सोनेरी किरण
वाळलेल्या जखमेचे मनात राहिलेले रक्तेरी व्रण
 
घामेजलेल्या उनातली वटवृक्षाची सावली
लक्ष्मीच्या रुपाने रस्त्यात मिळालेली पावली

मनाच्या कोन्यात कायमचा वास केलेली जशी नवी नवरी 
माझ्या नवसाला पावलेली आणि मनाला घावलेली परी

Wednesday, March 27, 2013

साद


मंद वाऱ्याच्या झुळूकेने   
शरीरावर मोरपीस फिरवावे तशी शहरालीस

कळतच न कळत घडते च्या ओळीत
जणू साताजन्माच्या ओळखीच्या आनंदाने मोहरलीस    

कधी कधी आपण काय बोललो
या पेक्षा फक्त बोललो हे पण खूप असते

मग अचानक विचारलेल्या प्रश्नांनंतर
शून्यात असणे हे कशाला लसते?

मनात दुसरेच वादळ चालू असते
मनातल्या भावनांना आपण ओलवत असतो

हृदयाची कळ दाबणे चालू असते
मनाचे ओठांवर न यायला मनालाच भुलवत असतो  

असा मनाशी पाठशिवणीचा खेळ खेळत असतो
समाजाच्या संहिताना झेलत झेलत मनाविरुद्ध मनालाच पोळत बसतो

कधी कधी आपल्याला हवी असणारी दोरी तीव्रतेने ओढावीशी वाटते
त्याच वेळी समाजाच्या संस्काराची तिजोरी आर्ततेने फोडाविशी वाटते     

समाजाने समाजासाठीच्या केलेल्या नियमाना अपवाद हवा
माहित आहे याला खतपाणी घातले तर सुरु होईल वाद नवा

हे समाजाचे अस्तित्व झुगारणे नाही
समाजाच्या तत्वावर बंडखोरीची तलवार उगारणे नाही

अपवादाला अपवाद म्हणूनच बघा
त्यालाही त्याची स्वतःची आहे जागा

आपण हा अपवाद आहे हे तुला माहित आहे
तुला माझी साद माझ्या सहित आहे

परत फुलराणी


तुला माहित आहे मी आज
बालकवींची फुलराणी परत फूलताना पाहिली
मनाची ओंजळ प्रेमाचा साज
तिला हवीहवीशी झुळूक झुलताना पाहिली

फुलपाखरांची गुंजारव मुंग्यांचे बिळ मातीतले
पाहताना पाहिली
अनवाणी पावले सागराच्या रेतीतले
जाताना पाहिली

अंतरीच्या दुखाला अंतकरणात
ठेवताना पाहिली
कधी कधी त्याना नकळत नेत्रात
वाहताना पाहिली

गतकाळातील वेदनांना
साहताना पाहिली
सद्यकाळातील रुदनाना
भोवताना पाहिली

तिच्या मनातले ओठावर
आणताना पाहिली
माझ्या मनातले माठावर
सांडताना पाहिली

बरेच काही बोलूनही
न बोलताना पाहिली
बरेच काही सलूनही
मन डोलताना पाहिली

बोलता बोलता न बोलूनही
मला काहीतरी सांगताना पाहिली
त्यामुळेच कि काय न लिहूनही
मी तिच्यावर कविता लिहिताना वाहिली

Monday, March 11, 2013

सल

पर्याय


जीवनात बऱ्याचदा येते अशी वेळ
दोन पर्यायामध्ये एकावर येताना होतो विचारांचा खेळ

मनाची होते उगीचच घालमेल
निर्णयापेक्षा बाकीच विचारांची रेलेचेल

काय करावे हे न सुचले कि काय करावे बरे?
मनाच्या या दोन दगडावर पाय ठेवण्याला काय म्हणावे बरे?

टक्केवारी ठरवून होत असते तर किती झाले असते छान?
हि गोष्टच अवघड भारी; जे ठरवू ते होईलच ह्याचे नसते भान

निर्णय मनाने घ्यायचा कि बुद्धीने नाही कळत
पुढच्या पुढे पाहू ह्या विचाराला पण गती नाही मिळत

कधी कधी वाटते अशिक्षित असण्याचे किती तरी फायदे
सुशिक्षितपणामुळे बुद्धीने भक्षित होण्याचेच जास्त सौदे

अशा लिहिण्याने तर कुठे होणार आहे निर्णय पक्का?
उगीचच शब्दांचा भडीमार आणि मनाची द्विधा १०० टक्का

पण एक खरे कि लिहून मनाला मिळतो थोडा आराम
निर्णय होवो न होवो नव्याला सुरुवात आणि जुन्याला राम राम

----आदिवीज, ०९-मार्च-२०१३