जन्माच्या गाठी
कुठे तरी ओलावा मिळतो म्हणेपर्यंत
नकाराचा दुष्काळ तुझ्या मनावर कोसळतो
देव हि तुझा (?) तुझी किती परीक्षा घेतो
कशाला तुला एवढी शिक्षा देतो?
जन्माच्या गाठी म्हणे वर ठरवल्या जातात
अशा गाठी बांधताना देव काय झोपतात?
पण मनाच्या कुचम्बनेने तुझा श्वास गुदमरतो
मग आपल्याला “तो” मिळवण्याचा हव्यास स्मरतो
मला माहित आहे तुझा देवावरील विश्वास
कधी कधी तर वाटते देव हाच तुझा श्वास
हा देव आहे याचा हा भास
कि त्याच्या स्मरणाने स्वतःच्या इच्छा मारण्याचा हव्यास?
नशिबावर विसंबून राहून स्वतःच्या मनाला समजावतेस
कशाला देवाच्या वाशिल्याला आजमातेस?
तो ह्या जगात तुझ्यासाठी नाही हे मनाला समाजाव
मला नाही वाटत त्याच्या जीवावर तुझ्या मनातील इच्छांचा मिळेल तुला गाव.
--आदिवीज (६-जुलै-२०१२)