Pages

Wednesday, July 25, 2012

बाळसे

बाळसे

बोलण्या बोलण्यातून प्रेमाचे बीज बाळसे धरू लागते
मग सगळेच आपल्याला हवे हवेसे मन करू लागते

तापलेल्या धरतीला पहिल्या पावसाचा शिडकावा फोफसायला लावतो
तसंच काहीतरी प्रेमाचा कवडसा आपल्या मनाला उक्सायला लावतो

एकदा का ते उकसले कि त्याला सगळे काही हवे असते
पण ह्यातले काहीतरी च मिळेल हे त्याच्यासाठी नवे असते

मग मनाचे आकांड तांडव सुरु होते
विचारांच्या पुढे जाऊन आचारांचे सांडव सरू होते

कुठून सुरवात कुठे शेवट याचा थांगपत्ता लागत नाही
मनावरची आपली सत्ता आपण सांगत नाही

मन आपल्या सारखे वागत नाही म्हणून आपल्यालाच आपला राग येतो
प्रेमाचा अंकुर फुटतोय या विचाराने हि मनाला सुखाचा झाग येतो   

बघ कसे मन आपली थट्टा करते
दुसऱ्याचे होऊन आपल्याशी सट्टा खेळते

कायमच मला कुठे थांबायचे हे कळत नाही
काही वेळेस कळते पण वळत नाही 

जाऊ दे थांबतो आता
नाही तर असाही एवढे लिहून मनाचा कोना राहतो रिता

------आदिवीज
१६-जुलै-२०१२

2 comments:

  1. आचारांचे (सांडव ) ha navin shabd vaatato.... sandav mhanje kay mhanayche aahe...? mhanje aadhi nusata vichaar asato aani mag nako te aachar suru hotat asaa tyacha arth aahe kaa..?( झाग) ha pan ek navin shabd...!

    ReplyDelete
  2. हो असाच त्याचा अर्थ आहे. पुणेरी भाषेत "सांडणेला" "सांडवणे" असे मला ऐकण्यात आले होते त्याचा अपभ्रंश आहे हा. तसे तुम्ही म्हणालात तेही खरे आहे. हा जसाच्या तसा शब्द मराठी मध्ये नाही.

    पाण्यामध्ये detergent टाकल्यानंतर आपण जेव्हा ढवळतो तेव्हा जो फेस येतो त्याला "झाग" म्हणतो. मला ही कल्पना नाही हा शब्द मराठी मध्ये आहे कि मराठी मध्ये रुळलेला आहे.

    Thanks for reading my poems & posting your observations!

    ReplyDelete