माझे जीवन या टोकाच्या निर्णयाप्रत येईल माझी विचारांची गंगा त्यात वाहून जाईल
रावणाची हनुमानाने जाळलेली लंका होईल माझेच निर्णय मलाच खायला येईल
अपेक्षांची उंची वाढली कि त्याचे अपयश पचवणे अवघड जाते.
कशासाठी जगायचे याची विचारणा मनाला केली कि तेही स्तब्ध होते.
दोन मनांच्या मधले द्वंद्व आणि शरीराची हेळसांड
मन होते क्रुद्ध आणि सोडले जातात सिगरेटचे धूरकांड
कुणासाठी जगायचे माझ्या स्वतःसाठी कि घरासाठी? याचे उत्तर अजून तरी मिळत नाही
आणि त्या विचाराच्या घेरावाने काय करावे कळत नाही
मनाची शांतता खायला उठते
आणि मी कुणाचाच राहिलो नाही हे पटते
जो धाडसाने स्वतःसाठी निर्णय घेतो तो खरा योद्धा
हे स्वतःला म्हणताना लाज वाटत नाही सुद्धा
------आदिवीज
१८-जुलै-२०१२
No comments:
Post a Comment