विचार खूप येतात पण निर्णय होत नाही
मनाच्या निर्णयाला समाजात पर्याय नाही
विचारांचा गुंता सुटता सुटत नाही
एका मनाला जे पटते ते दुसऱ्याकडे वटत नाही
कोड्यांच्या कोड्यात कोडे होऊन बसलोय.
विचारांच्या तबेल्यात बांधलेले घोडे होऊन फसलोय
मनाच्या आड्यातले पोहऱ्यात येत नाही
कोणता तरी एक निर्णय गहिरा होत नाही
निर्णयाच्या खडाजंगीत त्रेधा तीरपीट उडते
भीती आहे कि चुकून आपल्या हातून काही तरी अकल्पित घडते?
मनाच्या वावरातले वारे सोसाट्याने वाहत आहेत.
विचारांच्या मातीवर निर्णयाच्या गारा पोहत आहेत
माझ्या मनाचा वारू मी कसा सावरू
मी लागलो आहे मलाच बावरु
असे कधी या आधी नाही झाले
माझ्याच परसात माझ्या विरुद्ध वारे नाही वाहिले
ती सांगते जास्तीचा विचार करू नका
नशिबावर थोडा विश्वास राखा
थांबवतो या मनाला तिच्या सांगण्याला मान देऊन
पाहू नशिबाचे फासे आपल्याला सोडतात कुठे नेऊन
--आदिवीज (६-जुलै-२०१२)
असे कधी या आधी नाही झाले
ReplyDeleteमाझ्याच परसात माझ्या विरुद्ध वारे नाही वाहिले
these lines are superb...!