राग
दैव आणि देव दोघानीही तुझ्या मनाचे ऐकले नाही
तुझ्या इच्छांना त्यांनी दूर जणू फेकले काही
मी न येण्याचे जेव्हा तुला कळाले
होते नव्हते तेवढे पण आवसान तुझे गळाले
मग त्याचा राग / रुसवा कुणावर तरी निघायला नको?
आणि जवळचा म्हणून मीच तुझ्यापुढे यायला नको?
आपण कितीही नियंत्रण ठेवले तरी मनाची कवाडे रागाने उघडतात
मग “हसू?” साठी “नाचू?” सारखी वचने ओठातून अलगद बाहेर पडतात
हा राग माझ्यावर फक्त दाखवण्यासाठीच
खरे तर हा राग स्वतःचा स्वतःसाठीच
कुठेच कुणाची मला साथ का लाभत नाही या विचाराने मन त्रास देते
देव पण किती परीक्षा पाहतोय हे खरे तर त्याला रास होते?
म्हणशील किती तुम्हाला विचार करायची वाईट सवय
तुझ्या मनातले काव्यात गुंफायला कविता ही तर माझी एक तात्पुरती सोय
--------आदिवीज
१६-जुलै-२०१२
nice.. adjustment.....!
ReplyDelete