चाफेकळी
माझी एक चाफेकळी अशीच रुसून बसलीय
हातात तोंड खुपसून, डोळ्यातले थेंब सोसून बसलीय
काय माहित का तिच्या मनाप्रमाणे काही घडत नाही
मनावर ताबा ठेवण्याच्या प्रयत्नात तिच्या पदरात काहीच पडत नाही
तिला कसे समजावयाचे कि सध्या भेटणे शक्य नाही
नन्तर भेटू म्हणालो पण ते हि माझे पक्के नाही
यात तिची तरी काय चूक?
इच्छा पूर्तीची लांबतच जातेय भूक
कशाला तिला स्वप्ने पाहायला लावले
माझेच मन मला दूषणे द्यायला लागले
भेटण्याचे वचन देऊन मनापासून प्रयत्न करेन
भेटल्यावर तिच्या डोळ्यातील थेंबांचे रत्न तळ हातावर धरेन
-------आदिवीज
१६-जुलै-२०१२
No comments:
Post a Comment