“मी तुमच्यावर खूप खूप प्रेम करते” हे ऐकल्यावर मन कसे मोहरून गेले
आणि पुढच्या विचारांनी मात्र अंतःकरण गहीरून आले
काय काय मनात येते ते कसे सांगू?
मन आता पासूनच लागले सागर किनाऱ्यावर रांगू
पावसाच्या सरी झेलत हातावर हात पेलत वाट संपे पर्यंत तुझ्या सोबत चालावेसे वाटते
सागर किनाऱ्याच्या फेसाळ लाटा झेलत तुला चिंब भिजवावेसे वाटते
पापणीवरून अलगद पडणारे थेंब ओठांनी प्यावेसे वाटतात
नकळत तुझ्या ओठांवर ओठ घ्यावेसे वाटतात
ओठांची जुगलबंदी नाही सोडाविशी वाटते
तुझ्या नकळत तुला मिठीत ओढाविशी वाटते
धुंद होऊन बेधुंद व्हावेसे वाटते
डोळस असून अंध व्हावेसे वाटते
जीवनातले प्रेमाचे रहस्य उलगडावेसे वाटते
सांगण्यापेक्षा करण्यात स्वारस्य हे पटते
------आदिवीज
१७-जुलै-२०१२
nice ...poem...!
ReplyDelete